HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यातः अशोक चव्हाण

मुंबई आगामी महानगरपालिका,जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून बहुतांश ठिकाणची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा केली जाईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

आज टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रेदश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे,उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या निवडीवर चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले की, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन जातीयवादी पक्षाला फायदा होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. ठाणे महापालिकेत आघाडीची चर्चा जवळ जवळ पूर्ण झाली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. तर पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सन्मानपूर्वक तोडगा निघाल्यास आघाडी केली जाईल, असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.

आजच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विधान परिषदचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी खासदार तसेच ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार,माजी मंत्री नसीम खान, मधुकर चव्हाण, बसवराज पाटील, आमदार विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चारूलता टोकस, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. एम. एम. शेख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, प्रदेश सरचिटणीस ऍड. गणेश पाटील, राजेश शर्मा,सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, रामकिशन ओझा, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar

‘तुमच्या बालिश पणाचा मला त्रास होतोय’, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे पंकजा मुंडे संतापल्या!

News Desk

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना !

News Desk
महाराष्ट्र

” पंचवीस वर्षे युतीत सडली हे कळायला इतका उशिर का लागला? ‘

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांचा सवाल

मुंबई – शिवसेनेच्या पन्नास वर्षातील २५ वर्षे युतीत सडली हे कळायला इतका उशिर का लागला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेला केला आहे. त्यामुळे आता युतीत आणखी जास्त काळ सडण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारमधूनही बाहेर पडा, असा खोचक सल्लाही अहिर यांनी शिवसेनेला दिला आहे.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आणि भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत यापुढे स्वबळावर लढण्याची घोषणा गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अहिर यांनी काही सवाल उपस्थित केले.उद्धवजी म्हणतात की, त्यांच्या पक्षाची २५ वर्षे युतीत सडली, तर मग दुर्गंधी सुटेपर्यंत युतीतून बाहेर पडायचे ते का थांबले होते. आणि जर युतीतून बाहेर पडायचेच होते, तर महापालिका जागावाटपांच्या चर्चेचे नाटक तरी का केले. कुठेतरी आपल्याला हवी ती गोष्ट मिळत नाही, म्हणून आपल्याला ती गोष्टच आवडत नाही, असे म्हणण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत, शिवसेनेने आता आपल्या राजकारणासाठी मुंबईकरांना गृहीत धरणे सोडून द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.

ते पुढे असे म्हणाले की, कालच्या आपल्या भाषणात उद्धव यांनी असा उल्लेख केला की, मुंबईतल्या अमराठी भागातले प्रभाग आम्ही युतीत भाजपला दिले होते. आणि मराठीबहुल भाग आम्ही घेतले होते. याचा अर्थ अमराठी राहात असलेल्या भागांबद्दल शिवसेनेला ममत्व नाही का? अमराठी राहात असलेल्या भागांचाही विकास व्हावा,असे सेनेला वाटत नाही का, असा सवाल करत अहिर यांनी आपल्या या वक्तव्यावर शिवसेनेने अधिक खुलासा करण्याची मागणी केली आहे. तसेच युती तुटली तरीही दोन्ही पक्षांचे संकुचित राजकारण मात्र पुढेही चालूच राहाणार आहे, ही बाब आगामी मतदानात मुंबईकर चांगलेच लक्षात ठेवतील, असा टोलाही त्यांनी लगावला

Related posts

शेतकरी आत्महत्ये प्रकरणी करमाळा बंद, मुख्यमंत्री आल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही

News Desk

अण्णा हजारेंचा मोदी सरकाराला अखेरचा इशारा

News Desk

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला भीषण आग, दुकान जळून खाक

News Desk