HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

मुंबई: राष्ट्रवादी भवन येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर, खा. सुप्रियाताई सुळे, मुख्य प्रवक्ता नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, आमदार हेमंत टकले, आमदार विद्याताई चव्हाण, आमदार सुमनताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस मुनाफ हकीम, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, युवक उपाध्यक्ष रविकांत वर्पे, सेवादलचे अध्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष जानबा मस्के आदीसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व सेवादलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी! – छगन भुजबळ

News Desk

पुण्यातील ओशो आश्रमात अनुयायांचा प्रवेश; पोलिसांकडून लाठीजार्च

Aprna

आपली खरीप पिकं आता सुरक्षित राहणार !

News Desk
मुंबई

सेंट झेवियर्समध्ये ‘आमोद’ची ‘पखरण’

News Desk

मराठी वाङ्मय मंडळाच्या दिमाखदार महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई – १९२३मध्ये स्थापन झालेल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे यंदा ९३वे वर्ष. या वर्षात मंडळाने अनेक उपक्रम राबवले. त्यात झेवियर्स महाविद्यालयामध्ये १९,२० आणि २१ जानेवारी रोजी झालेला आमोद हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव विशेष उल्लेखनीय ठरला. या दिमाखदार महोत्सवाला विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी वाङ्मय मंडळ आयोजित या महोत्सवात एकूण दहा स्पर्धा रंगल्या. विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी यात आपली कलाकारी सादर केली. आमोदचे यंदाचे ५वे वर्ष होते. त्याचे मुख्य ठरले स्पर्धांमधली विविधता. ललित कला अंतर्गत पोस्टरबाजी आणि कार्टून फॅक्टरी तसेच साहित्य कला अंतर्गत काव्य नाटुकली या नव्या स्पर्धा होत्या. त्यामुळे त्यांबद्दल विशेष उत्सुकता दिसली. ब. न. पुरंदरे वक्तृत्व स्पर्धा म्हणजे आमोदचे विशेष वैशिष्ट्य. या स्पर्धेच्या विजेत्यांना चांदीचा फिरता चषक देण्यात येतो. यंदा हा मान टी. एम. लॉ कॉलेजने पटकावला. महाराष्ट्राची लोकधारा या लोकनृत्य स्पर्धेत स्पर्धक संघांनी बहारदार सादरीकरणे केली. स्पर्धांतला हा उत्साह पारितोषक वितरण समारंभातही कायम होता. आपआपल्या कॉलेजच्या विजेत्यांना चिअर अप करण्यासाठी एकच जयघोष सुरू होता.

या वर्षी आमोदमधील सर्वच स्पर्धा चुरशीच्या झाल्या. सर्वच कॉलेजांनी अव्वल क्रमांकासाठी मेहनत घेतली. एकपात्री अभिनय आणि वक्तृत्व स्पर्धेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.

आमोदच्या निमित्ताने मराठी वाङ्मय मंडळ च्या वार्षिक अंक ‘पखरण’चेही प्रकाशन झाले. या अंकामध्ये झेवियर्सच्या स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे लेख असून त्यांच्या लेखन कौशल्याला वाव देणारा हा उपक्रम होता.

Related posts

निष्टांवतांना डावलून नवख्यांना पद दिल्याने शिवसेनेत हाणामारी

Adil

सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपलाः खा.अशोक चव्हाण

News Desk

लोकायुक्तांकडे दररोज दाखल होतात 15 तक्रारी

News Desk