HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी संघटनेचा कुठलाही नेता अमित शहांना भेटणार नाही – राजू शेट्टी

नवी दिल्ली– स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राज्य सरकारमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वाढलीय. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कुठलाही नेता भेटणार नसल्याचं संघटनेचे अध्यक्ष-खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं, ते दिल्लीत पत्रकारांना बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एनडीएचा घटक आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा हे तीन दिवसांच्या दौऱ्यात या घटकपक्षांसोबतही चर्चा करणार आहेत. याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत अमित शहांना भेटू शकत नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. उलट दिल्लीत मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलनाची भाषा राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

स्वाभिमानी संघटनेचा मी प्रमुख राजू शेटी सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अमित शहा यांना भेटू शकत नाही माझ्या पक्षाचा मी प्रमुख आहे, माझ्या गैरहजेरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दुसरे कोणी भेटणार नाही .

अमित शहांच्या बैठकीसाठी मला भाजपकडून फोन आला होता.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी फोन केला होता मी शेतक-यांचा नेता आहे . माझ्यासाठी दिल्लीतील शेतक-यांची बैठक महत्त्वाची आहे.

जो चांगला उमेदवार देईल त्यांना आमचा पाठिंबा

शिवसेनेने दिलेल्या नावाला पाठिंबा राहील

एम एस स्वमिनाथन यांनी शेतक-यांच्या भल्यासाठी काम केले आहे.

शेतक-यांची कर्जमाफी करावी

स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्या

या दोन मागण्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करणार

– दिल्लीतील बैठकीला २२ शेतकरी संघटना सहभागी

– रामपाल जाट (राजस्थान), उड्डीआळी चंद्रशेखर (कर्नाटक), व्ही एम सिंग (युपी), योगेंद्र यादव (दिल्ली) उपस्थित.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता मी भाजपला ताकद दाखवतो”, खडसेंची भाजपविरुद्ध गर्जना

News Desk

“अमृताताई आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो”

News Desk

अजितदादा, आपण इतकी वर्ष उगाच वेगळे राहिलो !

News Desk