HW News Marathi
महाराष्ट्र

स्वारातीम विद्यापीठाच्या एमएस्सी केमिकलची प्रवेश परीक्षा 17 जूनला 

उत्तम बाबळे

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलामध्ये एम.एस्सी. (रसायनशास्त्र) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकुण सहा स्पेशलाइजेशनच्या शंभर जागेकरिता बी.एस्सी. (रसायनशास्त्र) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेच्या विषयातील गुणवत्ता क्रमानुसार प्रवेश दिला जात असे. विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी असलेली वाढती स्पर्धा लक्षात घेता, येत्या शैक्षणिक वर्षे २०१७-२०१८ करिता एम.एस्सी. प्रवेशाकरिता शनिवार, दि.१७ जून रोजी ऑफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

प्रवेश परीक्षेतील गुणवत्ता यादी नुसार व प्रवेशाकरिता असलेल्या नियमानुसार यावर्षी शंभर जागेकरिता एम.एस्सी. रसायनशास्त्र प्रथम वर्षाकरिता प्रवेश दिला जाईल. ही प्रवेश परीक्षा बि.एस्सी. रसायनशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित असून एमसीक्यू पद्धतीने रसायनशास्त्र संकुलात घेण्यात येणार आहे. याविषयाची अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती संकुलाच्या संचालिका डॉ संगीता माकोने यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आदित्य ठाकरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

swarit

“खाकी वेषातील दरोडेखोर परमबीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचंं”- हसन मुश्रीफ

News Desk

कोण होते मराठी भाषेतील पहिले पत्रकार ?

News Desk
महाराष्ट्र

१० रुपयाचे नाणे घेण्यास ग्रामीण भागातील बँकांचा नकार ,मॅनेजरने शेतक-याला बँकेतून बाहेर काढले.

News Desk

स्पेशल स्टोरी

उत्तम बाबळे

एस.बी.एच शाखा व्यवस्थापकाविरुद्ध कारवाई करण्याची शेतक-याची मागणी नांदेड:- भोकर तालुक्यातील माै.नागापुर येथील एक शेतकरी एस.बी.एच.शाखा भोकर येथे १० रुपयाचे १०० नाणे जमा करण्यासाठी गेला असता बँक शाखा व्यवस्थापकाने ते नाणे घेण्यास नकार देत शेतक-याला अपमानीत करुन बँकेबाहेर काढले असून त्या शेतक-याने हे नाणे जमा करुन सदरील व्यवस्थापकाविरुद्ध कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे. खरीप हंगाम २०१७ सुरु झाला असून ग्रामीण भागातील शेतक-यांनी आपल्याकडील बचतीतून जी जमापुंजी जमवलेली आहे ती बाजार पेठेत आनून बी बियाणे ,खते खरेदी करत आहेत.याच अनुशंगाने माै.नागापुर येथील मारोती पोषट्टी बेरदेवाड हा शेतकरी त्यांच्या पत्नीने घरगुती वापरातून बचत केलेले १० रुपयाचे १००नाणे असे एकून १००० रुपये घेऊन २२ मे २०१७ रोजी बियाणे खरेदीसाठी भोकर येथे आला असता बाजार पेठेत त्यांचे ते नाणे कोणीही स्विकारले नाहीत.म्हणून त्याने त्या दिवशी ते नाणे भोकर येथील एस.बी.एच.शाखेतील त्याच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले व रितसर बँकस्लीप भरुन रोकड जमा करण्याच्या खिडकीला गेले असता रोखपालाने ते नाणे जमा करुन घेण्यास नकार दिला.याबाबद बँक व्यस्थापकांना त्या शेतक-याने हे नाणे न स्विकारण्याचे कारण विचारले असता त्यांना योग्य उत्तर देण्याऐवजी अपमानीत करुन बँकेबाहेर हाकलून दिले.

वास्तविक पाहता आर.बी.आय.ने १० रुपयाचे नाणे चलनातून बाद केलेले नाही.तरी देखील काही व्यापारी व बँका ते स्विकारत नाहीत.” मै धारक को रुपये अदा करने का वचन देता हूँ! ” असे वचन आर.बी.आय.ने दिलेले असतांनाही ग्रामीण भागातील बँका हे ब्रीद विसरुन सामान्य नागरीक व शेतक-यांना नाहक त्रास देत आहेत.असाच त्रास मारोती बेरदेवाड यांना झाला असल्यामुळे त्यांनी बँक वरीष्ठ अधिकारी व शासनाकडे न्याय मागीतला असून त्यांना अपमानीत करणा-या त्या शाखा व्यवस्थापका विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी म्हणून एका निवेदनाद्वारे भोकर उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे यांच्याकडे मागणी केली आहे.वरीष्ठ अधिकारी याबाबद काय कार्यवाही करतील ? याकडे त्या गरीब शेतक-यांसह त्रास सहन करावा लागत असलेल्या अनेकांचे लक्ष लागले आहे.

Related posts

मोदींनी इथेनॉल निर्मिती करावी, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला

News Desk

NCBचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

Aprna

‘मिहान’ मधील प्रकल्पांना सवलतीच्या दरात वीज देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार! – सुभाष देसाई

Aprna