HW News Marathi
महाराष्ट्र

हरीण चाललं पंढरपूरला, विठूरायाच्या दर्शनाला

हिंगोली – सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालख्या पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. दरवर्षी पालख्यांमध्ये काही ना काही नाविण्यपूर्ण घटना पाहावयास मिळतात. यावर्षीही अशीच एक घटना सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगावमधून श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली. ही पालखी जेव्हा हिंगोलीमध्ये आली तेव्हा या पालखीसोबत एक हरीण सहभागी झालीय. अगदी वारकऱ्यांप्रमाणेच ती हरीण पालखीच्या सगळ्या संस्कारात सहभागी होत आहे. ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम होतो, तिथे पालखीसोबत हरीणही मुक्काम करत आहे. मुक्कामानंतर पालखी पुढील प्रवासाकरिता मार्गस्थ होते, तेव्हा त्यांच्यासोबतच या हरीणचा प्रवासही सुरू होतो. पालखी पंढरपूरला गेल्यानंतर या हरीणाला वनविभागाची परवानगी काढून शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थान इथं आणण्याचा मानस पालखीच्या प्रमुखांनी व्यक्त केलाय.

या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करू शकता…

https://youtu.be/DP1aV6adHdc

https://youtu.be/83zknxeuPo8

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे यांना मोठा दिलासा, जामीन मंजूर

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने फडणवीसांचा खोटारडेपणा उघड! – नाना पटोले

Aprna

महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी; महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

Aprna