HW News Marathi
महाराष्ट्र

उल्हासनगरमध्ये केमिकल टॅंकचा स्फोट, तीन लहान मुलं गंभीर जखमी

महानगर पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे घडला हा प्रकार

जखमींना ममता रुग्णालयात दाखल

उल्हासनगर ( गौतम वाघ )

उल्हासनगरमधील कॅम्प नं ०१, टिळक नगर येथील पाण्याच्या टाकी येते पालिकेने सफाई कामगार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या हजेरी शेड आहे .परिसरात फवारणी करीता केमिकलचा वापर करण्यासाठी सफाई कामगारांनी केमिकलचं टॅंक उगड्यावर ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी अनेक लहान मुले खेळ खेळण्यासाठी जातात .अचानक केमिकल टँकचा स्फोट झाला, त्याच परिसरात राहणारे हरिअंत सिंग (वय ०९) प्रवीण सोनी (१३) हर्ष सोनी (१५)या तीन लहान मुले त्याठिकाणी खेळ खेळत असताना झालेल्या स्फोटात गंभीररित्या होरपळून जखमी झाले. नागरिकांच्या साह्याने तातडीने त्यांना ममता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी ,तेथील शाखा प्रमुख व समस्त शिवसेनिक यांनी घटनास्थळी जाऊन जखमी मुलांची भेट घेतली.

नागरिकांची प्रतिक्रिया

हा झालेला प्रकार सर्व सफाई कामगार यांच्या दुर्लक्षितपणामुळे झालं आहे.या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील लॉकडाऊन विरोधात खासदार उदयनराजेंचं ‘भीख मांगो’आंदोलन

News Desk

…तर होऊ शकते कारवाई; जाणून घ्या होळी आणि धुलिवंदनाची नियमावली

Manasi Devkar

उल्हासनगरात मराठी नगरसेवकांचा वाढता टक्का

News Desk