सातारा | महाराष्ट्राची १४ वी विधानसभा निवडणुक अनेक अर्थांनी प्रचंड गाजली. या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, अन्य पक्षांची अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. याचदरम्यान, प्रचंड गाजली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातली प्रचारसभा. आज शरद पवारांच्या या प्रचारसभेला वर्ष पूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचले आहे.
त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते.
त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती.
ते म्हणाले, #शरदपवार संपले.
पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावलाजनता चिंब भिजली
दिल्ली मात्र थिजली#सातारा_सभा_वर्षपूर्ती pic.twitter.com/PiWQ8sPt8I— NCP (@NCPspeaks) October 17, 2020
राष्ट्रवादीने भाजपला डिवचताना आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे कि, “त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, शरदपवार संपले. पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला. जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली.” वर्षभरापूर्वीच्या शरद पवारांच्या त्या ऐतिहासिक सभेची आठवण करून देत राष्ट्रवादीने भाजपवर हा थेट निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या ‘त्या’ एका सभेने स्वतःच्या बालेकिल्ल्यातून उदयनराजेंचा अत्यंत दारुण पराभव गेला. उदयराजे ‘त्या’ साताऱ्यातील भर पावसातील सभेचा राजकीय बळी ठरले अशी जोरदार टीका त्यावेळी झाली.
महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीत विशेषतः राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर स्वतः शरद पवार मैदानात उतरले. या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्वतः शरद पवारांनी राज्यभर फिरून आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. यावेळी साताऱ्यात राष्ट्रवादीचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या समर्थनार्थ शरद पवारांनी १८ ऑक्टोबर २०१९ रोजी भर पावसात घेतलेली प्रचारसभा प्रचंड प्रमाणात गाजली. “लोकसभेमध्ये माझ्याकडून उमेदवार निवडण्यात चूक झाली”, असे म्हणत शरद पवार यांनी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला होता.
पवार पावसातले त्या भाषणात नेमके काय म्हणाले होते ?
“लोकसभेमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. “एखाद्या माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. लोकसभेमध्ये उमेदवार निवडण्यामध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय, पण आता ती चूक सुद्धरविण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील प्रत्येक तरुण आणि वडील धारी व्यक्ती २१ तारखेची वाट बघत आहे. आपल्या मतांनी निर्णय देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे भर पावसात सभा संबोधित करत उपस्थितांना आवाहन केले. ”