HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

ठाण्यात २ जुलैपासून १० दिवस लॉकडाऊन, तर लवकरच अधिसूचना जारी करणार

मुंबई | महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे. राज्यातील मुंबईजवळ असलेल्या ठाण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने  वाढत आहे. त्यामुळे  आज (२९ जून)  ठाणे शहरात येत्या २ जुलैपासून पुढील १० दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. आज पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यात बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठाणे शहरात लॉकडाऊनची माहिती ठाणे शहर पोलिसांनी ट्वीट करत  दिली आहे.

ठाणे शहरातील या कडक लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते ११ जुलै मध्यरात्री १२ वाजेर्पंयत संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला आहे. यानंतर लॉकडाऊन लवकरच अधिसूचना जाहीर होणार  असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

ठाण्यात काल (२८ जून) ३४१  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. ठाणे शहरात आतापर्यंत एकूण ८१९८  कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकूण ३८१९  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४०७२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत २७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.

राज्यातील काही  भागात लॉकडाऊन वाढवण्याची मागणी | मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२८ जून) फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येतील, असे सांगितले होते. काही भागातील अधिकारी पुन्हा लॉकडाऊन करण्याची परवानगी मागत आहेत. माझी तशी इच्छा नसली तरी वेळ पडल्यास संबंधित परिसर लॉकडाऊन करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

 

 

Related posts

चांगले काम करणारे सगळे भाजपचे असतात, असा शिवसेनेचा विश्वास !

News Desk

कुमार आयलानींचा ओमी कलानीला विरोध का?

News Desk

मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो !

News Desk