HW News Marathi
महाराष्ट्र

सोमय्यांवर १०० कोटींचा दावा, अनिल परब यांनी बजावली नोटीस!

मुंबई। भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्या यांना तशी नोटीस पाठवली असून ७२ तासात उत्तर देण्यास सांगतिले आहे.सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच प्रादेशिक परिवहन विभागात परब हे बदल्याचे रॅकेट चालवत असल्याचा जाहीर आरोप केला होता.

मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

त्याबाबतचे पुरावे त्यांनी सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाला दिले होते. परब यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर मंगळवारी मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी सोमय्यांचे आरोप आणि सत्य परिस्थिती यासंदर्भातली माहिती घेतल्याचे समजते.परब यांनी सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या ट्वीटचा संदर्भ या नोटिसीमध्ये दिला आहे. सोमय्या यांनी ‘अनिल परब यांचा घोटाळा’ असे ट्वीट १० जून २०२१ रोजी केले होते आणि नवी दिल्लीत अंमलबजावणी संचालनालय व अन्य विभागांकडे तक्रारी दाखल करणार असल्याचे म्हटले होते.

सोमय्या यांनी सातत्याने बिनबुडाचे आरोप केले

सोमय्या यांनी तीन सप्टेंबर २०२१ रोजी ट्वीट करून परब यांची दापोली तालुक्यात साई आणि सी क्राऊंच अशी दोन अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा दावा केला होता. ही रिसॉर्ट सागरीकिनारा नियमन क्षेत्रात (सीआरझेड) अनधिकृतपणे बांधल्याचा आरोप करण्यात आला. वास्तविक सदानंद कामत यांना ही जमीन विकल्यानंतर ही जमीन व बांधकामाशी परब यांचा कोणताही संबंध नाही. तरीही सोमय्या यांनी सातत्याने बिनबुडाचे आरोप केले, असे परब यांनी नोटिसीमध्ये नमूद केले आहे. सोमय्या यांनी पाच, सहा व आठ सप्टेंबर २०२१ रोजी बजरंग खरमाटे यांच्या सांगली व पुणे मालमत्तांना भेटी देण्याबाबत ट्वीट केले होते. खरमाटे हे परब यांचे सचिव असल्याचा उल्लेख करून त्यांच्याशी संबंध जोडला. वास्तविक खरमाटे हे परिवहन विभागातील अधिकारी असून माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, असे परब यांनी म्हटले आहे.

बांधकामाशी परब यांचा कोणताही संबंध नाही

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबतचे २७०० पानांचे पुरावे सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईत आयकर विभागाला दिले. ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावे मी जाहीर केली होती. यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असे सोमय्या यानी पत्रकारांना सांगितले.दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबतचे २७०० पानांचे पुरावे सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईत आयकर विभागाला दिले. ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावे मी जाहीर केली होती. यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असे सोमय्या यानी पत्रकारांना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोरजबरदस्तीने जशाच्या तशा हा कृषी कायदा राज्यात लागू होणार नाही – मुख्यमंत्री

News Desk

#Coronavirus : संचारबंदीचे उल्लंघन, पोलिसांकडून १२२ जणांवर गुन्हे दाखल

swarit

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला इशारा, तर आम्ही उरलेले दोन पक्ष एकत्र राहू….

News Desk