HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना हजार रुपये पाठवा | धनंजय मुंडे

मुंबई | रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास सामान्यांच नाही तर राजकीय नेते मंडळींना देखील हाल होत असल्याचे समोर आले आहे. ‘खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतील हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना पण पाठवा. या सरकारचे आता तरी डोळे उघडू द्या’ अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला.

मुंबई-नाशिक रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घोटीजवळील पाडळी गावात शुक्रवारी आदित्य यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले. शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना खड्ड्यांचा फटका बसला आहे.

खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी डेडलाईन दिली आहे. पाटील यांनी डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील सर्व खड्डे बुजवले जातील असा दावा केला असल्याची माहिती पाटील यांनी २२ ऑगस्टला ट्विट दिली आहे.

पाटील यांनी म्हटले की, हायब्रीड अँन्युइटी प्रणाली अंतर्गत मंजूर कामे नियमाधीन राहूनच करावित, त्यात अनियमितता आढळल्यास संबंधित व्यक्तींची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माहिती आणि प्रसारण खाते मिळालेल्या प्रकाश जावडेकरांबद्दल या गोष्टी जाणून घ्या

News Desk

“हा विषय सरकारचा, मी काही बोलू शकत नाही”, मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

समिती स्थापन झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, आजही राज्यात एसटी सेवा बंद

News Desk