HW News Marathi
महाराष्ट्र

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार, बोर्डाचे आदेश

मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये यांच्यावर परीक्षेबाबत काय निर्णय होणार याची टांगती तलवार होती. याचे उत्तर राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. १०वी, १२वीच्या परीक्षा या ऑफलाईन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी बोर्ड अनुकूल नसल्याने ऑफलाईनच परीक्षा होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

सद्यस्थितीला दहावी, बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यात दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम, 21 कोटींचा दंड वसूल करा, सोमय्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

News Desk

पवारांना संकटकाळी जाग असतेच, चंद्रकांत पाटील दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा | सामना

News Desk

मराठा आरक्षणासाठी कायदेशीरबाबी पूर्ण कराव्या लागतील | मुख्यमंत्री

swarit