HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंना केंद्रीय मंत्री पद..!

मुंबई। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर जास्तीच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, दिग्गज आणि अनुभवी मंत्र्यांकडून राजीनामा घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्याकाळात शिवसेना आणि भाजपची युती देखील होती. मात्र, आता शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर राणे हे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेबाबत सातत्याने आक्रमक टीका करत असल्याचं वारंवार दिसून आलं आहे.

यामुळे एकप्रकारे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने नारायण राणे यांच्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे का ? अशी चर्चा सुरु आहे. तसेच, शिवसेनेनं भाजपचा केंद्रातील पाठींबा देखील काढून घेतल्यानंतर शिवसेनेचं रिक्त झालेलं मंत्रिपद त्यांना देण्यात येईल अशा चर्चांना देखील आता उधाण आला आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा केंद्राच्या मंत्रिमंडळात आता समावेश झाला आहे. राणें यांना मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात काल (७जुलै) ला देण्यात आला, मराठा समाजातील चेहरा तसेच शिवसेना-भाजपची युती तुटल्यामुळे मुंबईसह कोकणातील येत्या स्थानिक निवडणूका बघता राणेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे अशा चर्चा आता माध्यमांमध्ये सुरू आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

भाजपच्या या निर्णयाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘नारायण राणे यांनी शिवसेना सोडून १८ वर्षे झाली आहेत. कोणाला ठरवून मंत्रिपद दिलंय असं नाही. दोन्ही घराण्यांमध्ये आता हळूहळू सगळ काही चांगलं होतंय. आगामी काळात कटुता कशी कमी होईल यावर केंद्र काम करतंय असं वाटतंय,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेहलोत-ठाकरे सदिच्छा भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उद्या होणार निवडणूक

News Desk

४-४ खाती संभाळून सुद्धा तुम्हाला विधानसभा राखता आली नाही! – धनंजय मुंडेंची पंकजा मुडेंवर टीका

Aprna