HW News Marathi
महाराष्ट्र

४-४ खाती संभाळून सुद्धा तुम्हाला विधानसभा राखता आली नाही! – धनंजय मुंडेंची पंकजा मुडेंवर टीका

बीड | बीड जिल्ह्याच्या ५ नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या रणधुमाळी पाहवयास मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हे बहीण भाऊ उमेदवारांच्या प्रचारादरम्यान एकमेकांना टोले बाजी करतांना दिसून येत आहेत. बीडच्या काल (१९ डिसेंबर) वडवणी येथे प्रचार सभेला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे वर टीका केली होती. या टीकेला धनंजय मुंडे यांनी चांगलेच प्रतिउत्तर दिले.

राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ३५  टक्के जनतेशी थेट संबंधित असलेले व समाजातील वंचित उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला कमी लेखणे म्हणजे प्रत्यक्ष महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्यासारखे आहे, माजी मंत्री पंकजाताई यांनी माझ्यावर, माझ्या पक्षावर टीका करावी मात्र माझ्याकडे असलेल्या वंचितांना न्याय देणाऱ्या या खात्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये, असे धनंजय मुंडे यांनी केज येथील नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना म्हणले.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी वडवणी येथे नगर पंचायत प्रचारसभेत बोलताना सामाजिक न्याय हे ३२ नंबरचे खाते असून, या खात्याचा मंत्री लोकांना काही देऊ शकत नसतो, अशा आशयाचे वक्तव्य करत एकप्रकारे सामाजिक न्याय विभागाला कमी लेखले होते, याचाच संदर्भ घेऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

‘आम्हाला कुणी नाव ठेवत आहे, आमची कुवत काढली जात आहे, आम्ही गरीब माणसं आहोत, पण ज्यांनी पूर्वी ४-४ खाती सांभाळली तरी जनतेने त्यांना ३२ हजाराने नाकारले त्यांची कुवत काय असावी; त्यांनी आमची कुवत विचारणे निव्वळ हास्यास्पद आहे, असा खोचक टोला देखील धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पवाराचं कलरफुल राजकारण आहे”, गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबोल!

News Desk

जपानहुन आलेल्‍या ६१ परदेशी नागरिकांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

News Desk

खासदार संभाजीराजे नविन पक्ष काढा ! कोणी केली मागणी ?

News Desk