HW News Marathi
महाराष्ट्र

‘शिवसेना नेहमीच निवडणूकीसाठी तयार असते’, शिवसेनेचं विधान

मुंबई। महाविकास आघाडी सरकारधल्या काँग्रेसने गेल्या अनेक दिवसांपासून स्वबळाचा नारा सुरू आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने राज्यभरात दौरे सुरू केले आहे. आता त्यानंतर शिवसेनेनं सुद्धा शिवसंपर्क मोहिम हाती घेतली आहे. ‘शिवसेना नेहमीच निवडणूक साठी तयार असते यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही’ असं सूचक विधान शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी केलं.शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या उपस्थितीत ही संघटनात्मक बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पातळीवर घराघरात पोहचण्याचा प्रयत्न असणार-

शिवसंपर्क मोहीम हे शिवसेनेचा हा नेहमीचा उपक्रम आहे. आज जिल्हाप्रमुख ५० च्या आत संख्या होती. दोन सत्रात ही चर्चा झाली. आज दुसरी लाट नियंत्रणात तरीही धोका कायम आहे. याच भान ठेवून गर्दी न होता कार्यक्रम संरचना असते, नवीन मतदार नोंदणी असते, निवडणूक पूर्वतयारी असते यासाठी शिवसंपर्क मोहीम राबवणार आहे, असं देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.तसंच, ‘माझं गाव कोरोनामुक्त गाव यातून गाव पातळीवर घराघरात पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे, असा एक व्यापक कार्यक्रम आहे. हे सर्व कोरोना नियमाला धरूनच असणार आहे’

शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी, जनतेमध्ये जाऊन कामं करा-

तसंच, ‘तुम्ही आघाडी किंवा युती होणार का.? याची चिंता करू नका तुम्ही फक्तं जनतेची कामं करा. कोविड १९ संसर्ग काळात तुम्ही चांगलं काम केलं. अशीच चांगली कामं पुढेही करत रहा. शाखा प्रमुखांनी प्रत्येक गाव कोरोनामुक्तं करा. महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जनतेसाठी कामं करा. आता आपण सत्तेत आहोत. सत्तेत असताना तुम्ही शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी, जनतेमध्ये जाऊन कामं केली पाहिजेत. राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नं करा, मी तुमच्या पाठीशी आहे.’ असा सज्जड दम देखील कार्यकर्त्यांना दिला.

‘पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमीच मार्गदर्शन करतात. आमदार खासदार ते शिवसैनिकांपर्यंत ते मार्गदर्शन करतात लोकांचा विश्वास आहे संघटना बळकटीकरण करणं गरजेचं आहे असं स्फूर्ती येणारं आजचं मार्गदर्शन होतं. मुळात शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही’ असंही देसाई म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने कुठे दुचाकीची अंत्ययात्रा तर कुठे बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा केला निषेध   

News Desk

सचिन वाझेंनंतर अनिल देशमुख आणि परमवीर सिंग यांचीही हकालपट्टी करा ! | किरीट सोमय्या

News Desk

मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

News Desk