HW News Marathi
व्हिडीओ

मोदींच्या मंत्रिमंडळात दानवेंना लागली लॅाटरी तर आठवलेंचं नशिब फळफळलं!

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होत असताना महाराष्ट्रातील केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचाही राजीनामा घेण्यात आल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, आता त्यावर पडदा पडला असून दानवे यांचे मंत्रिपद सुरक्षित राहिले आहे. राज्यातील संजय धोत्रे आणि प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील चौघांना स्थान मिळाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारामध्ये किमान 11 मंत्र्यांना नारळ दिला आहे. दानवे यांच्यासह संजय धोत्रे यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. पण अखेर त्यावर पडदा पडला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत असताना झालेल्या बदलांच्या वावटळीत आपलं मंत्रिपद टिकवण्यात दानवे यांना यश आल्याचं दिसतं. किंबहुना दानवे यांना रेल्वे, कोळसा आणि खाण यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

#RaosahebDanave #RamdasAthawale #NarendraModi #ModiCabinet #CabinetReshuffle #AmitShah #ModiGovt #CabinetExpansion

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MahavikasaAaghadi Vs BJP | महाविकासआघाडी भाजपच्या या 4  दिग्गजांवर कारवाई करणार ?

Arati More

Loudspeaker च्या भूमिकेवर हिंदू समाज सर्वात जास्त नाराज! – Sanjay Raut

News Desk

मुख्यमंत्री Eknath Shinde आणि Shivsena पक्षप्रमुख Uddhav Thackeray आमने सामने येणार

Seema Adhe