HW News Marathi
महाराष्ट्र

‘आता पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे’, संभाजीराजेंचा सरकारला इशारा!

कोल्हापूर। मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राज्य सरकारकडून सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या होत नसतील तर मग पुन्हा मूक आंदोलन सुरु करणार असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहेत. ते आज कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होतो. खासदार संभाजीराजे पुढे बोलताना अस देखील म्हणाले ते म्हणाले की, एमपीएससीच्या २१८५ तरुणांच्या बाबतीत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. अजित पवार यांना पुन्हा एकदा फोन करून विनंती करणार असल्याचंही यावेळी संभाजीराजे म्हणाले.

मी मुळातच शांत स्वभावाचा आहे-

मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी २१ दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी २१ जून रोजी सांगितले होते. सरकारने २१ दिवसात निर्णय घेतला नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असं संभाजीराजे म्हणाले होते. आम्ही मराठा समाजाचे पाच मूक आंदोलने जाहीर केली होती. कोल्हापूरनंतर नाशिकला आंदोलन झाले. या दोन्ही आंदोलनाला अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. कोल्हापूरचे आंदोलन झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकार भेटायला तयार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर आम्ही भेट घेतली. जवळपास ३ तास चर्चा झाली. त्यानंतर सरकारने आमच्याकडे २१ दिवसांचा वेळ मागितला. म्हणून तो आम्ही दिला आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं. तसेच मूक आंदोलन स्थगित नसून या काळात आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये जात समन्वयकांशी चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं होतं.

काय म्हणाले संभाजीराजे?

छत्रपती म्हणाले की, समाजाला रस्त्यावर आणून आंदोलन करणार नाही. समाज बोलणार नाही, आता लोकप्रतिनिधींनीच बोलायला पाहिजे. अधिवेशनात कुणीच काही बोलले नाहीत. मी मुळातच शांत स्वभावाचा आहे, कधी आवाज वाढवायचा कधी काय करायचं हे आम्हाला माहीत आहे, असंही ते म्हणाले. मी आरक्षणाच्या बाबतीत काही मुद्दे मांडले. नरेंद्र पाटील यांनी कसे आरक्षण मिळणार हे देखील मांडले. ते काही चुकीचे करतील असं मला वाटत नाही. नरेंद्र पाटील यांच्या वडिलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण : श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही !

News Desk

महेश कोठेंची शिवसेनेतून हकालपट्टी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार कारवाई

News Desk

गेली २०-२५ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीची पालिकेत सत्ता आहे… सुप्रिया सुळेंच्या आरोपावर महापौरांची प्रतिक्रिया!

News Desk