HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनानंतर आता झिका व्हायरसची चिंता ! केरळात १४ जणांना लागण!

नवी दिल्ली । कोरोनाचा पहिल्या रुग्ण सापडलेल्या केरळमध्ये आजही कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. देशातील केरळ हे राज्य सध्या कोरोनाने सर्वाधिक ग्रस्त आहे. अशा स्थितीत आणखी एका व्हायरसने डोकं वर काढल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरचं आव्हान अधिकच गळद झालं आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचे १४ रुग्ण आढळून आले असून त्यात एका नवजात बाळाच्या मातेचा समावेश आहे.केरळमध्ये काही जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’कडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी १४ नमुने झिका पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये तिरुवनंतपुरममधील नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या एका महिलेचा समावेश असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. २८ जूनपासून या महिलेला झिका व्हायरसची लक्षणं दिसायला सुरुवात झाली होती, मात्र आता तिच्यावर उपचार करण्यात येत असून ती लवकरच यातून बरी होईल, असं सांगण्यात आलं आहे.

झिका व्हायरसचा इतिहास-

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार झिका व्हायरसचा प्रादुर्भाव हा डासांपासून होतो. युगांडामध्ये पहिल्यांदा झिका व्हायरस हा माकडांच्या शरीरात आढळून आल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर १९५२ साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला. आतापर्यंत अफ्रिका, अमेरिका आणि आशिया खंडात या व्हायरसची माणसांना लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

झिका विषाणूची लक्षणं-

ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे हे झिका विषाणूची प्राथमिक लक्षणं आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो. ही लक्षणं दोन ते सात दिवसापर्यंत कायम राहतात. असं असलं तरी सुरुवातीला आलेल्या तापावरून झिका विषाणूची लागण झाल्याचं सांगणं कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन निदान करणं आवश्यक आहे.

झिका विषाणूची लागण कशी होते?

एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. या डासांची निर्मिती चांगल्या पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता आहे. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. विशेषत: याची लागण गर्भातील बाळाला होण्याची शक्यता असते. तसेच बाळाला विविध आजार देखील होण्याची शक्यता असते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांनी संपूर्ण भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे टार्गेट केले हेच आमचे यश – विनायक राऊत

News Desk

महाराष्ट्राचे पुढारपण ऑनर किलिंगच्या वाढत्या धब्ब्यांनी काळवंडले जात आहे का?

News Desk

राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार

Aprna