लखनऊ। कोरोना महामारीत उत्तर प्रदेश सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप केला जात होता.त्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काहीजण प्रशंसा करतायत.ऑस्ट्रेलियाचे खासदार कॅग कॅली यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे . क्रॅग कॅली यांनी केवळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रशंसाच केली नाही तर ते आम्हाला उधारित मिळू शकतात काय ? अशी अजब मागणी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे खासदार कॅग यांनी ही मागणी केली आहे. शनिवारी (१० जुलैला) या संदर्भात त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट केलं आहे . ते म्हणाले , भारतातल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आम्हाला उधार देऊ शकतील काय ? आम्ही त्यांच्याकडून मदत घेऊन ‘ आयव्हरमेक्टिन’च्या कमतरतेच्या संकटातून बाहेर निघू शकू सध्या आमच्या देशात निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे .
Congratulations to Uttar Pradesh & its Chief Minister @myogiadityanath for showing the way on IVERMECTIN
WELL DONE
We need strong leaders to do everything they can to save lives & use any medical treatments available to STOP suffering, deaths & lockdownshttps://t.co/d7DnTwlBFj
— Craig Kelly (@CraigKellyMP) July 12, 2021
गेल्या काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित रूग्णांचे मृतदेह तरंगताना सापडले होते. यावरून उत्तर प्रदेश सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. कोरोना महामारीत उत्तर प्रदेश सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप तज्ज्ञ संख्यिकी आणि विरोधकांनी केला होता. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या एका खासदाराने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. क्रॅग कॅली यांनी जे चॅमी यांनी केलेल्या एका ट्वीटला प्रतिउत्तर दिलं आहे . जे चॅमी यांनी ट्वीटमध्ये सांगितलं होतं की , एकट्या उत्तर प्रदेशात भारताच्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के लोक राहतात . उत्तर प्रदेशात गेल्या ३० दिवसांत कोरोनामुळे मृतांचं प्रमाण केवळ २.५ टक्के आहे . तर १ टक्क्यांहूनही कमी रुग्ण आढळून आले आहेत . मात्र , या विपरित परिस्थिती महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात भारतच्या एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के लोक राहतात . महाराष्ट्रात १८ टक्के कोरोना रुग्णांची संख्या आहे . त्यापैकी ५० टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
‘आपल्या राज्यात नैराश्याची स्थिती निर्माण झाली आहे. असा एखादा मार्ग आहे का, की ते त्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला काही दिवसांसाठी देऊ शकतील. जेनेकरून ते आपल्याला आयव्हरमॅक्टिनच्या तुटवड्यातून बाहेर काढू शकतील’, असं क्रँग केली म्हणाले आहेत.
त्याच बरोबर क्रँग केली यांनी महाराष्ट्राची देखील आकडेवारी मांडली आहे. महाराष्ट्रात भारतातील ९ टक्के लोकसंख्या आहे आणि १८ टक्के कोरोना केसेस होत्या आणि एकूण मृत्यूंपैकी पंन्नास टक्के आकडेही येथेच होते, असंही त्यांनी शेअर केलेल्या ग्राफ्समधून सांगितलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.