HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंवर कोणतंही दबावतंत्र नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

मुंबई। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे यांचं कोणतंही दबाव तंत्र नाही. त्या असं काही करणार नाहीत, असं आशिष शेलार यांनी सांगितलं. आशिष शेलार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणतंही दबाव तंत्र नाही. पंकजा मुंडे कधी असं करत नाहीत, करणार नाहीत. कधी कधी कार्यकर्त्यांच्या भावनाचा आक्रोश होतो. तो काही पक्ष द्रोह असल्याचं मानण्याचं कारण नाही, असं शेलार यांनी स्पष्ट केलं. तसेच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराजीच्या बातम्यांवर उत्तर दिलं आहे. त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं.

नानांची विधाने बदलतात-

यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. नाना पटोले आपल्या विधानावर ठाम राहत नाहीत. ते नेहमीच विधान बदलतात. आधी फोन टॅपिंगबद्दल बोलले. भरसभागृहात त्यांनी हे सांगितलं. त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचं वक्तव्य बदललं. तिकडे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. आता विदर्भात गेले आहेत वाटतं. पुन्हा हवामान बदललं तर पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील. जो माणूस स्वत: च्या विधानावर टिकू शकत नाही. त्याची केस काय टिकणार?, असा सवाल करतानाच शरद पवारांनी त्यांच्याबद्दल विधान केलं आहे. ते खरंच आहे. त्यामुळे त्यांची विधाने गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.यावेळी त्यांनी ईडीच्या चौकश्यांवरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. इन्कम टॅक्स आणि ईडी कुणाच्या मागे लागली नाही. गुन्हेगारांच्या मागे लागली आहे. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला हवा, असा सवाल त्यांनी केला.

पंढरपूर दाखवूच

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेवरही टीका केली. शिवसंपर्क मोहीम हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कितीही संपर्क अभियान करा, पक्ष विस्तार करा, स्वबळावर लढा, काहीही करा. पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला पंढरपूर दाखवूच, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Live Update : १६९ आमदारांसह महाविकासआघाडीकडून बहुमत सिद्ध

News Desk

मुंबई होणार आता खड्डेमुक्त तर कामचुकार कंत्राटदारांवर होणार कारवाई – महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

मविआचे नेते यंत्रणांच्या दबावाला घाबरणार नाहीत; नवाब मलिकांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

News Desk