HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रिमंडळाची आज बैठक, टप्प्याटप्प्याने अनलॉक होण्याची शक्यता?

मुंबई।महाराष्ट्र राज्यात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांमध्ये शिथिलता आणण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज (१४जुलै) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्यमंत्रिडळाच्या या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन दुकानांच्या वेळा वाढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता देखील आता सांगण्यात येत आहे. पुढील आठवड्यांपासून निर्बंधात असलेलं महाराष्ट्र राज्य टप्प्याटप्याने अनलॉक होणार असल्याचं बोललं जात आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जुलै रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर ९ जुलै रोजी राज्य आपतकालिन विभागातील अधिकार्यांसोबतही बैठक घेतली होती. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डाँक्टर आणि वरीष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून अहवाल मागितला होता. त्या अहवालानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील निर्बंध टप्या टप्याने कमी करून राज्य “ओपनिंग अप” कडे नेण्याचा निर्णय घेणार आहेत.

येत्या आठवड्यापासून निर्बंध हटवण्याची शक्यता-

टप्याटप्याने सर्व आस्थापना सुरू करण्याचा प्लॅन तयार करण्यात येत आहे. दुकानांच्या वेळा वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. तर यामध्ये रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री १० पर्यंत केली जाणार असून, ५० टक्केची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाण्याची शक्यता आहे, यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचा-यांचे लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. तसंच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंट प्रवेशात प्राधान्य देण्यासंदर्भातील विचार सुरू आहे. शक्य असेल तिथं बंदिस्तऐवजी मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था हॉटेलना करण्याच्या सूचना दिल्या जातील अस देखिल.

रेल्वे प्रवासी संघटना आणि सामान्य नागरिकांकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, राज्य सरकार सावध भूमिका घेत तुर्तास तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झोपड्यांचे पुनर्वसन करताना मानवी दृष्टीकोन!  – जितेंद्र आव्हाड

Aprna

अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री पदावर टांगती तलवार?

News Desk

फडणवीस कितीही प्रयत्न करा, बिघाडी काही होत नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल !

News Desk