HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक नेत्याने चक्क कार्यकर्त्याच्या शेतात केली ऊस लावण!

 

इस्लामपूर। कामेरी गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या अनिरुद्ध पाटील या शेतकऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रतिक पाटील यांना शेती पाहण्यासाठी निमंत्रित केले होते, ऊस लावणीचा मुहूर्त श्रीफळ चढवून प्रतीक पाटील यांनी करावा एवढीच माफक अपेक्षा असताना प्रतीक पाटील यांनी चक्क उसाच्या सरीमध्ये जाऊन ऊसाचे बियाणे लावण करत उपस्थितांना जणू आश्चर्याचा धक्काच दिला.

कार्यकर्त्याच्या शेतात चक्क ऊस लावणी-

कामेरी येथील प्रगतशील शेतकरी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनिरुद्ध पाटील यांनी प्रतीक पाटील यांच्याकडे शेतीस भेट देण्यासाठी आग्रह केला होता.या आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून प्रतीक पाटील हे कामेरी येथे शेतीस भेट देण्यासाठी आले होते.यावेळी अनिरुद्ध पाटील यांच्या शेतामध्ये ऊस लावणीचा मुहूर्त केला जाणार होता. यासाठी प्रतीक पाटील यांनी श्रीफळ वाढवून ऊस लागणीचा मुहूर्त करावा. यासाठी उपस्थितांची गडबड सुरू होती.या दरम्यान प्रतीक पाटील यांनी आपली पॅन्ट गुडघ्यापर्यंत खेचत उसाच्या प्रत्यक्ष लावणीसच प्रारंभ केला.उसाच्या सरीमध्ये असणाऱ्या ओलाव्यात उसाचे कांडे एकापाठोपाठ एक अंतर ठेवून लावत चक्क ऊस लावन केली.परदेशातून अतिशय प्रतिष्ठेची असणारी अर्थशास्त्रातील एम.एस.ही पदवी प्राप्त केलेले प्रतीक पाटील हे शेताच्या सरीमध्ये जाऊन उसाची लावण करतील असं स्वप्नातही न वाटणारी गोष्ट सत्यात उतरली आहे.

युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज-

दरम्यान या ऊस लावणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून उच्चविद्याविभूषित सुशिक्षित असणाऱ्या युवकांच्या समोर एक आगळा वेगळा आदर्श या निमित्ताने प्रतीक पाटील यांनी ठेवलेला आहे.

तुम्ही उच्चशिक्षित असा,नोकरदार असा किंवा व्यवसायिक असा पण शेती,माती आणि आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे आणि वाढवली पाहिजे,युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.यासाठी युवक मित्रांना लागेल ते सहकार्य करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतीक जयंत पाटील यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जास्त काय सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे ‘हे’ पर्याय!

News Desk

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

News Desk

“शुद्धीवर येऊन बोला, मंदिरं बंद ठेवण्याचे आदेश केंद्राचेच”,विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका!

News Desk