HW News Marathi
महाराष्ट्र

‘झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, शिवसेनेचा हात,’अतुल भातखळकरांचा घणाघात

मुंबई। भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याचं वृत्त होतं. मात्र, मंगळवारी संध्याकाळी हा अहवाल सापडला देखील. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, शिवसेनेचा हात असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

झोटिंग समितीचा अहवाल गहाळ होण्यामागे एकमेव कारण म्हणजे खडसेंना क्लीनचिट नाही आहे. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की यामध्ये घोटाळा झाला आहे. त्यामुळे ईडीची चौकशी शेवटच्या टप्प्यापर्यंत आल्यानंतर झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्याचं षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने रचलं होतं. हा अहवाल लवकरात लवकर खुला करुन जनतेसमोर मांडावा, भाजपची मागणी आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले.

झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याची चर्चा सुरू झाली होती-

झोटिंग समितीचा अहवाल सापडला

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिवांचे कार्यालय आणि सामान्य प्रशासन विभागाकडे झोटिंग समितीचा अहवाल मागितला होता. मात्र, गेली दीड वर्ष अहवाल सापडत नसल्याची माहिती विभागाकडून पवार यांना दिली जात होती. त्यामुळे झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंगळवारी अजित पवार यांची भेट घेऊन झोटिंग समितीचा अहवाल सापडला असून तो आजच मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याची माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधून सुटका, आरोपी अटक

News Desk

ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडणार हे केवळ स्वप्नरंजन

News Desk

कलाकारांचे आमरण उपोषण !

News Desk