HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींच्या हस्ते युपीमध्ये होणार १५०० कोटींच्या विकास योजनांचे उदघाटन!

वाराणसी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघात अर्थातच वाराणसीचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १५०० कोटींच्या विकास योजनांचे उद्घाटन आणि शिलान्यास होणार आहे, विकास योजनांच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभेला मार्गदर्शन करतील. तब्बल आठ महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा वाराणसी दौरा ठरणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ हे ट्वीट करत म्हणतात की, बाबा विश्वनाथांच्या काशी नगरीत आज पंतप्रधानांच्या हस्ते रस्ते, जल परिवहन, शिक्षण, आरोग्य, पर्यटन इत्यादींशी संबधीत साधारण १५०० कोटींहून अधिकच्या विकासयोजनांचे लोकार्पन आणि शिलान्यास होणार आहे. वाराणसीच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय पंतप्रधानांचे हृदयापासून धन्यवाद.

तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये योगी अदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, आज पंतप्रधानांतर्फे जपान आणि भारतच्या सहयोगाचे प्रतीक ‘रुद्राक्ष’ आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटरचे उद्धाटन केले जाणार आहे. काशीच्या पुरातन वैभवाची पुनर्स्थापना करण्याचा संकल्प घेतलेल्या आदरणीय पंतप्रधानांचे हार्दिक धन्यवाद.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनंतर पाकिस्तानची तातडीची बैठक

News Desk

पाकिस्तानने भारतावर केला शस्त्रसंधी उल्लंघनाचा आरोप

News Desk

खेळवत ठेवणं हेच शरद पवारांचं काम!; ST च्या मुद्द्यावरून नारायण राणेंची टीका

News Desk