HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश…!

मुंबई। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज १६ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यात मनसेनेही दंड थोपटले आहेत. मात्र, त्याआधीच या पक्षांतराने मनसेची काळजी वाढवलीय.

 

आदित्य शिरोडकर म्हणाले, “मी माझी राजकीय कारकीर्द २००० मध्ये सुरु केली होती, जेव्हा मी रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. मी विद्यार्थी परिषद आणि रूपारेलच्या बीव्हीएस युनिटमध्ये सक्रिय होतो. माझी कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी या पदावर निवड झाली होती. कॉलेजमध्ये असताना एस.यू.एस.ने शिवाजी पार्क येथे “लता मंगेशकर” शो आयोजित केला होता. त्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतला आणि या कार्यक्रमासाठी रूपारेल बीव्हीएस युनिटमधूनही काम पाहत होतो. हा कार्यक्रम “भुज” भूकंप मदत निधीसाठी आयोजित करण्यात आला होता.” अस देखिल युवा नेते आदित्य शिरोळडकर म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्याचं मोठं काम सध्या शिवसेनेसमोर आहे. भाजपसोबत ताटातूट झाल्यानंतर शिवसेनेसमोरचं आव्हान वाढलं आहे. एकट्याच्या जिवावर निवडणुका जिंकणं आणि वर्षानुवर्षं सत्ता असल्यामुळे अँटि इन्कम्बन्सीचा सामना करणं, अशी दोन्ही आव्हानं शिवसेनेला पेलावी लागणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यात १०० रुपयांत १० वर्षे वायफाय!

News Desk

दिवाळीचा आनंदाचा शिधाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने होणार! – रविंद्र चव्हाण

Aprna

मुंबईवर अद्यापही मुसळधार पावसाचं सावट, आकाशात काळ्या ढगांची गर्दी

News Desk