HW News Marathi
महाराष्ट्र

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी होणार मोदींच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक..!

नवी दिल्ली | संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरु होण्याची शक्यता आहे. याआधी १८ जुलै नंतर एक मीटिंग होणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याचं बोललं जातंय. सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लोकसभा स्पीकर यांनी सुद्धा सर्वपक्षीय बैठक सायंकाळी ४ च्या दरम्यान बोलवली आहे. ‘कॅबिनेट कमिटी ऑफ पार्लमेंटरी अफेअर्स’ने १९ जुलै ते १३ ऑगस्टच्या दरम्यान मॉन्सून सत्र ठेवण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात खासदारांना हे अधिवेशन सुरु व्हायच्या आधी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेण्याची सूचनादेखील देण्यात आली आहे.

मॉन्सून सत्राच्या आधी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली असून यामध्ये संसदीय कामं व्यवस्थित चालवी तसेच अन्य प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. भाजपच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकदेखील आज आय़ोजित करण्यात येणार असल्याचं समजतंय. पावसाळीस सत्रात होणाऱ्या कामगाजाबाबत ही बैठक होणार आहे.त्याचबरोबर कॉंग्रेसने देखील आपल्या खासदारांची आज महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक ऑनलाईन पद्धतीने आयोजित होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास एका महिन्यापर्यंत चालणाऱ्या या मॉन्सून सत्रादरम्यान जवळपास २० बैठका होण्याची शक्यता आहेत. सामान्यत: संसदेचं पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होतं आणि स्वातंत्र्यदिनाच्या आधी समाप्त होतं. संसदीय कार्यविषयक कॅबिनेट समितीने या अधिवेशनाच्या कार्यकाळासंदर्भात केलेल्या शिफारशीनुसार सत्राच्या दरम्यान संसद परिसरात कोरोनाशी निगडीत सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचं पालन केलं जाईल. या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात प्रवेश करणाऱ्यांनी कोरोना लशीचा कमीतकमी एक डोस घेतलेला असणे अनिवार्य असणार आहे.त्याचबरोबर केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात साधारण १५ विधेयकं पारीत करणार आहे. यात प्रामुख्याने डीएनए टेक्नॉलॉजी, असिस्टंट रिप्रोडक्टिव, ट्रिब्युनल रिफॉर्म इत्यादी विधेयकांचा सामावेश असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार

Aprna

अंबाजोगाईत अल्पवयीन अत्याचार प्रकरणी; पोलीस, होमगार्ड व सेवानिवृत्त नायब तहसीलदार ताब्यात!

News Desk

जिल्ह्याच्या बाहेरही बस सेवा होणार सुरू, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk