HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल!

मुंबई। शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. यावृत्ताला महापौर कार्यालयातूनही दुजोरा देण्यात आला आहे.सूत्रांनुसार किशोरी पेडणेकर यांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांच्या प्रकृती संदर्भातील अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. किशोरी पेडणेकर यांची तब्येत लवकर सुधारावी म्हणून सर्वजण प्रार्थना करत आहेत.

कालच महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. तर काही भागांत दरड कोसळली आहे. मुंबईमध्ये २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Aprna

कोकणासह नवा महाराष्ट्र घडवू या !

swarit

किरीट सोमय्यांचं थेट साताऱ्यात जाऊन अजित पवारांना आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर….

News Desk