HW News Marathi
महाराष्ट्र

‘एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडींग’, फडणविसांची टिका!

मुंबई। संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोन टॅपिंगवरुन काँग्रेसनं गदारोळ घातला. मोदी सरकारकडून राजकीय मंडळींसह अनेक क्षेत्रातील लोकांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप करुन खळबळ उडवून दिली. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. भारतीय संसदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. इतकंच नाही तर एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडींग होत आहे. ज्याद्वारे बदनामीचा अंजेडा राबवला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय.

संसंदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना पंतप्रधान मोदी यांनी संधी दिली आहे. अशावेळी अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशानं अधिवेशनाचं कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही मीडिया हाऊसेसनी Pagasus च्या बातम्या दाखवल्या, छापल्या. काहींनी एक यादीही दिली. पण त्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अशा कोणत्याही पद्धतीचं हॅकिंग करत नाही. आपल्याकडे असलेल्या टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळे असं काही करण्याची गरजंच नाही, असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

अनेकदा फोन टॅपिंग

अशा बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे. लवकरच सत्य काय ते समोर येईल. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातही फोन टॅपिंगचा आरोप झाला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंह यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर जे काम झालं आहे ते कायदेशीर झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॉड्रिंग रोखण्यासाठी फोन टॅप झाल्याचं सांगितलं. तसंच ते योग्य असल्याचं समर्थनही केलं होतं. त्याचबरोबर फोन टॅपिंगची बातमी येणं चुकीचं असल्याचं सांगत, याबाबत यापुढे काळजी घेऊ असंही ते म्हणाले होते. UPAच्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीररित्या योग्य आहे हे देखील सांगण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार, उर्जामंत्र्यांची घोषणा

News Desk

कुमार आयलानींचा ओमी कलानीला विरोध का?

News Desk

बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपातांच्या घटनांबाबत कडक कारवाई करा! – नीलम गोऱ्हे

News Desk