नागपूर | महाराष्ट्र दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आज (१२ एप्रिल) नागपूरमध्ये कोरोनाचे १४ रुग्ण आढळून आले आहे. एकाच दिवसात नागपूरमध्ये १४ जणा कोरोना पॉझिटिव्ही असल्याची माहिती नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. एकच खळबळ माजली आहे. आजच्या वाढलेल्या रुग्णांमुळे नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता ४१ वर पोहोचली आहे.
14 people have tested positive for #COVID19 in Nagpur today: Tukaram Mundhe, Municipal Commissioner, Nagpur #Maharashtra (File pic) pic.twitter.com/2z2oFj8Mw5
— ANI (@ANI) April 12, 2020
हे १४ जण दिल्लीच्या मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मागील महिन्यातील दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तब्लिगी जमातच्या मरकजमध्ये कार्यक्रमात अडीच हजार तब्लिगी एकत्र आले होते. महाराष्ट्रातून तब्बल १४०० तब्लिगी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यापैकी ५६ जण नागपूरचे होते. त्या सर्व तब्लिगींना क्वारंटाईन करण्यात आले होते.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १८९५ वर येऊन पोहोचली. आज राज्यात १३४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी सर्वाधिक ११३ नवे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. तर नागपूर १४, मीरा-भायंदरमध्ये ७, पुण्यात ४, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरारमध्ये प्रत्येकी २, तर रायगड, अमरावती, भिवंडी, आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.