HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांच्या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघांचं जोरदार प्रत्युत्तर!

मुंबई। भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आता शिवसेनेचे संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. वाघ यांनी संजय राऊतांना त्यांच्याच भाषेत एक सवाल केलाय. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले नसल्याचं लेखी उत्तर केंद्र सरकारनं दिलं आहे. केंद्र सरकारच्या या उत्तरावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय होत त्या टिकेला वाघांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

‘ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग, महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात मा.उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलयं. मग, राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय.

संजय राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले नाहीत, असं केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटलं आहे. हे तुम्हाला पटतं का?, असा सवाल राऊत यांना केला. त्यावर राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तुमचाही खरोखरच विश्वास बसतोय का हे आधी विचारलं पाहिजे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. सरकार खोटं बोलत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल पण सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगाससचा परिणाम आहे. सरकार भ्रमिष्ट झालं आहे, असा घणाघाती हल्ला राऊत यांनी चढवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“होय मी CDR मिळवला करा माझी चौकशी”, फडणवीस सभागृहात कडाडले

News Desk

जालन्यात १ कोरोना पॉझिटीव्ह, दादरच्या पोलिस स्टेशनमधील हा कर्मचारी आहे

swarit

‘त्यात चुकीचं काय केलं’, अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याच संजय राऊतांकडून समर्थन…!

News Desk