मुंबई। राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षाच आहे. मात्र कोकणात पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिह्यातील चिपळूण आणि खेडमध्ये परिस्थिती भयावह झाली आहे. कोकणातील याच परिस्थितीचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला आहे, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोकणातील पूर परीस्थितीची माहिती घेतली. आणि या बरोबरच कोकणातील परिस्थितीसाठी केंद्र सरकार कडून पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
तर राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी बोलतांना म्हणाले.
Spoke to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray and discussed the situation in parts of Maharashtra in the wake of heavy rainfall and flooding. Assured all possible support from the Centre to mitigate the situation. Praying for everyone’s safety and well-being. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
चिपळूणची भयावह परिस्थिती
रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर आला आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.
चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा आहे.
वाशिष्ठी, शिवनदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढली
चिपळूण शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेलेअसून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे .वाशिष्टी शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .शहरातील जुना बाजार पूल ,बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड ,चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपुर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशुराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगर मधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत. याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक जण घरात अडकले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.