HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, लोकसभेत भाजपची मागणी

नवी दिल्ली | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसूलीचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. दरम्यान, याचे पडसाद थेट दिल्लीतही उमटले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत केली आहे. महाराष्ट्रात इतके दिवस गुन्हेगार खंडणी मागणी मागत होते.

आता सरकार खंडणी मागू लागलं आहे, गृहमंत्री खंडणी मागत आहेत. कुंपण शेत खाऊ लागलं आहे आणि पाण्याला तहान लागली आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. खंडणी मागणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे. गिरीश बापट यांच्या पाठोपाठ खासदार नववीन राणा कौर यांनीही राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

महाराष्ट्रात खंडणी मागण्याचं काम जोरात सुरु आहे. १६ वर्षे सेवेत नसलेल्या सचिन वाझेंना पुन्हा नियुक्त कसं काय करून घेतलं? महाराष्ट्रात फडणवीस सरकार असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना सचिन वाझेंना पुन्हा सेवेत रूजू करून घ्या म्हणून फोन केला होता. मात्र फडणवीस यांनी सचिन वाझेंना सेवेत घेण्यास नकार दिला.

उद्धव ठाकरे हे फडणवीसांनंतर मुख्यमंत्री झाले त्यांनी खुर्चीवर बसताच परमबीर सिंग यांना निर्देश दिले की सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घ्या. सचिन वाझेंना नियम डावलून सेवेत घेण्यात आलं. सचिन वाझेंवर एवढे गंभीर आरोप झाले तेव्हा परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. महाराष्ट्रात हे असे प्रकार घडू लागले तर एक वेगळी परंपरा राज्यात पडेल त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली पाहिजे अशी मागणी नवनीत राणा कौर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रपती ट्रम्प संतप्त 

News Desk

जेव्हा ट्रम्प मोदीशर्ट घालतात

News Desk

पंतप्रधान मोदी सर्वात लोकप्रिय नेते!

News Desk