नवी दिल्ली | देशात लॉकडाऊनदरम्यान कोरोनाबाधितांची संख्या आता ५७३४ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ५४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाने आतापर्यंत १६६ जणांचा बळी घेतला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज (९ एप्रिल) पत्रकार परिषदेत दिली. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ तर होत आहे. पण दुसऱ्या बाजुला ४७३ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
473 people recovered & discharged from the hospital so far. Total 5734 confirmed cases reported in the country till date, 549 new cases in the last 24 hours. 166 deaths have been reported till dates, 17 deaths since yesterday: Lav Agrawal, Joint Secy, Ministry of Health #COVID19 pic.twitter.com/RuRI2dh0E1
— ANI (@ANI) April 9, 2020
दरम्यान, देशात आत्तापर्यंत १,३०,००० सॅम्पल्सची कोरोना चाचणी करण्यात करण्यात आल्या असून त्यापैकी ५७३४ सॅम्पल्स करोना पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. भारतीय रेल्वेनेही २५०० डॉक्टर आणि ३५ हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली आहे. रेल्वेची ५८६ आरोग्य युनिट्सची साखळी, ४५ उपविभागीय रुग्णालय, ५६ विभागीय रुग्णालय, ८ प्रोडक्शन युनिट रुग्णालय आणि १६ झोनल रुग्णालय यांना कोविड १९ ला लढा देण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
Supplies of PPEs, masks, and ventilators have now begun. 20 domestic manufacturers in India have been developed for PPEs, orders for 1.7 Crore PPEs have been placed and the supplies have begun. 49,000 ventilators have been ordered: Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry pic.twitter.com/eI7Hpm85HI
— ANI (@ANI) April 9, 2020
“हरियाणा राज्यात ‘दत्तक कुटुंब अभियाना’अंतर्गत १३००० कुटुंबांना ६४ लाखांची मदत केंद्र सरकार करणार आहे”, अशीदेखील माहिती लव अग्रवाल यांनी दिली. “पीपीई, मास्क आणि व्हेंटिलिटर्सचा पुरवठा करण्यास सुरूवात केली असून देशातील २० उत्पादकांनी पीपीई पुरवले आहेत. पीपीई, मास्क भारतातच तयार केले जाणार आहेत. आतापर्यंत १.७ कोटी पीपीईची ऑर्डर देण्यात आली आहे. त्याचबरोबर ४९,००० व्हेंटिलिटर्सचीदेखील ऑर्डर दिली गेली आहे”, असेदेखील अग्रवाल यांनी सांगितली.
Under 'Adopt a Family' campaign in Karnal (Haryana), 13000 needy families are being given the help of Rs 64 Lakhs: Lav Agrawal, Joint Secy, Ministry of Health #COVID19 pic.twitter.com/QlQOALHpF1
— ANI (@ANI) April 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.