HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात २ कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, एकूण मृतांचा आकडा ३१ वर

पुणे | पुणे शहरातील दोन कोरोनाबाधित महिलांचा आज (१२ एप्रिल) मृत्यू झाला आहे. संगमवाडी परिसरातील ५८ वर्षीय आणि सोमवार पेठेतील ५६ वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही जडलेले होते. सोमवार पेठेतील ५६ वर्षीय महिलेला कोरोनारोबरोबर मधुमेह आणि हायपर टेन्शनची व्याधी होत्या. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृत्यू मिळाली आहे.

तसेच ५८ वर्षीय महिलेचा कोरोना, निमोनिया आणि किडनीचाही विकार होता ससून रुग्णालयात मृत्यू, महिलेचा निमोनिया आणि किडनीचाही विकार होता. या दोन्ही महिलांवर या सदर महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे आता पुण्यात एकूण मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे.

राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोना रुग्णांबरोबर मृतांची संख्या ही राज्याच्या तुलनेत वाढत आहे. १०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यातील मृतांचा आकडा पाहिला तर देशात सर्वाधिक मृत्यूदर पुणे जिल्ह्याचा असल्याचे दिसते. दरम्यान, पुण्यात आतापर्यंत २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत १७०० पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पोलीस कार्यालयात ५०% हजेरी, इतरांना Work From Home’, पोलीस महासंचालकांचे आदेश

News Desk

एकनाथ खडसेजी, तुम्ही खात्री बाळगा !, अमृता फडणवीसांचे ट्विट

News Desk

बीडमधील वडवणीत नगरपंचायतच्या मतदान केंद्राबाहेर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

Aprna