मुंबई | महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आज (२५ नोव्हेंबर) तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबईत २०१३ रोजी शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी फाशीच्या शिक्षेला आवाहन देणाऱ्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.
या प्रकरणी ४ डिसेंबर २०१४ रोजी तिघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आज न्यायालयाने तीन दोषींची फाशीची शिक्षा रद्द करून तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
2013 Shakti Mills gang-rape case | Bombay High court sets aside the sentence of death penalty of three accused, sends them to life imprisonment pic.twitter.com/cjQmKhUnYn
— ANI (@ANI) November 25, 2021
मुंबईमधील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ रोजी एका महिला छायाचित्रकार आपल्या सहाकाऱ्यासोबत फोटोग्राफीसाठी गेली होती. त्या वेळी महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. या प्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. यात एक अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. तर सिराज खानला जन्मठेपेची शिक्षा तर इतर तीन आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.