HW News Marathi
महाराष्ट्र

त्या’ कक्ष अधिका-याला कारणे दाखवा नोटीस

तो अध्यादेश नाही की परिपत्रक ते फक्त पत्र

-शिक्षण मंत्री विनोद तावडे

मुंबई – देव-देवतांचे फोटो सरकारी कार्यालयात लावू नये असा कोणताही अध्यादेश नव्हता तसेच यासंदर्भात कुठेलही परिपत्रक‍ काढण्यात आले नव्हते. कक्ष अधिकाऱ्याने या संदर्भात केवळ पत्रक काढले होते. उपसचिवाची मान्यता न घेता पत्र काढणाऱ्या त्या कक्ष अधिका-याला २५ जानेवारी रोजीच याबाबतची कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकारांना सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देव-देवतांचा अध्यादेश असल्या संदर्भाचा उल्लेख केला होता, असे सांगताना तावडे म्हणाले की, हा शासनाचा अध्यादेश नव्हता, नीट माहिती न घेता चुकीच्या माहितीच्या आधारावर त्यांना वक्तव्य करायला लागले. शिवसेनेचे मंत्री, आमदार, सजग असते तर पक्षप्रमुखांना योग्य माहिती दिली असती व असे चुकीचे वक्तव्य आले नसते असेही त्यांनी सांगितले.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत टेंडर येते असे पक्षप्रमुख उद्ध्दव ठाकरे म्हणाले होते. याबाबत बोलताना तावडे म्हणाले की, मंत्रीमंडळात कोणतेही टेंडर येत नाही. यासंदर्भात योग्य माहिती घेऊन वक्तव्य केले असते तर लोकांची दिशाभूल झाली नसती असेही त्यांनी सांगितेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन

News Desk

काकांच्या पावलावर रोहीत पवारांचे पाऊल, ४ वाजताच APMC पोहोचले मार्केटमध्ये

News Desk

“औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्यांशी…” – संजय राऊत

Manasi Devkar