HW News Marathi
Covid-19

आज एका दिवसात सर्वाधिक २ हजार ३४७ नवीन रुग्ण, तर राज्यात एकूण संख्या ३३ हजारवर पोहोचली

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. राज्यात आज एका दिवसात २ हजार ३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. राज्यातील दिवसेंदिवस वाढ्यात कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज ३१ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. तर राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१७ मे) सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोविड १९ पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्च २०२० मध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण ६७९ एवढे होते ते मे २०२० मधील पहिल्या पंधरवडयात दिवसाला ८,६२८ प्रयोगशालेय नमुने इतके वाढले आहे. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढे आहे.

राज्यात ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या ११९८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ९,औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १,लातूर मध्ये १, तसेच अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या

  • मुंबई २०,१५० (७३४)
  • ठाणे: २२८ (४)
  • ठाणे मनपा: १५५० (१८)
  • नवी मुंबई मनपा: १३६८ (१४)
  • कल्याण डोंबिवली मनपा: ५२० (६)
  • उल्हासनगर मनपा: १०१
  • भिवंडी निजामपूर मनपा: ४८ (२)
  • मीरा भाईंदर मनपा: ३०० (४)
  • पालघर: ६१ (२)
  • वसई विरार मनपा: ३५९ (११)
  • रायगड: २३९ (५)
  • पनवेल मनपा: २०६ (११)
  • ठाणे मंडळ एकूण: २५,१३० (८११)
  • नाशिक: १०५
  • नाशिक मनपा: ७१ (१)
  • मालेगाव मनपा: ६७५ (३४)
  • अहमदनगर: ५६ (३)
  • अहमदनगर मनपा: १९
  • धुळे: १० (३)
  • धुळे मनपा: ७० (५)
  • जळगाव: २०५ (२६)
  • जळगाव मनपा: ६१ (४)
  • नंदूरबार: २३ (२)
  • नाशिक मंडळ एकूण: १२९५ (७८)
  • पुणे: १९९ (५)
  • पुणे मनपा: ३४६४ (१८८)
  • पिंपरी चिंचवड मनपा: १५८ (४)
  • सोलापूर: ९ (१)
  • सोलापूर मनपा: ३६४ (२४)
  • सातारा: १३१ (२)
  • पुणे मंडळ एकूण: ४३२५ (२२४)
  • कोल्हापूर: ३० (१)
  • कोल्हापूर मनपा: ६
  • सांगली: ४२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)
  • सिंधुदुर्ग: १०
  • रत्नागिरी: ९५ (३)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: १९१ (५)
  • औरंगाबाद:९७
  • औरंगाबाद मनपा: ८४२ (३१)
  • जालना: २८
  • हिंगोली: ९६
  • परभणी: ५ (१)
  • परभणी मनपा: १
  • औरंगाबाद मंडळ एकूण: १०६९ (३२)
  • लातूर: ४२ (२)
  • लातूर मनपा: २
  • उस्मानाबाद: ७
  • बीड: ३
  • नांदेड: ५७
  • नांदेड मनपा: ६२ (४)
  • लातूर मंडळ एकूण: १२३ (६)
  • अकोला: २८ (१)
  • अकोला मनपा: २४१ (१३)
  • अमरावती: ६ (२)
  • अमरावती मनपा: १०४ (११)
  • यवतमाळ: ९९
  • बुलढाणा: ३० (१)
  • वाशिम: ३
  • अकोला मंडळ एकूण: ५११ (२९)
  • नागपूर: २
  • नागपूर मनपा: ३५५ (२)
  • वर्धा: २ (१)
  • भंडारा: ३
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर: १
  • चंद्रपूर मनपा: ४
  • नागपूर मंडळ एकूण: ३६८ (३)
  • इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण: ३३ हजार ५३ (११९८)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाबाधित रुग्णांवर ‘या’ औषधाचा होत आहे चांगला परिणाम

News Desk

कोरोनाचे संकट पाहता विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून सुरू होणार

News Desk

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता वारांनुसार दुकाने सुरु राहणार

News Desk