HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

शेतकऱ्यांना २५ हजार रुपये देतो म्हणून सांगितले आणि हाती भोपळा दिला !

पालघर | “नवीन सरकारने बजेटमध्ये एक नवीन पैसा शेतकऱ्यांना दिला नाही. २५ हजार रुपये देतो म्हणून सांगितले आणि हाती भोपळा दिला,” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली होती. पालघरमध्ये आज भाजप मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, “हे  बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. आणि अशीच बेईमानीचे हे सरकार पहिल्यादिवसापासून करत आहे. २५ हजार हेक्टरी मदत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे,” अशी मागणी महाविकासआघाडीच्या सरकराने केली होती. नवीन सरकारने बजेटमध्ये एक नवीन पैसा शेतकऱ्यांना दिला नाही. २५ हजार रुपये देतो म्हणून सांगितले आणि हाती भोपळा दिला. एक नवा पैसा दिला नाही, शेतकऱ्यांची बेईमानी करण्यापासून त्यांच्या सरकारला सुरुवात झाली,” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान, “वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसविले, आणि ४० टक्के गुण मिळालेले सत्तेत आले. अशा प्रकारचे सरकार फार काळ चालणार नाही, असा टोलाही फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर केली. यानंतर महाविकासआघाडीचे सरकार काय म्हणाले, आम्हाला द्याचे आहे. आम्ही मोदी सरकारकडे मदत मागतोय, मग सरकार बनविताना मोदीसाहेबांची आठवण नाही झाली. शब्द देताना मोदीसाहेबांची आठवण नाही आली. आता काय मोदीसाहेबांच्या जिवावर तुम्ही शब्द दिला होता का, असा सवा फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असे वाटले नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला.

तुमच्या मनगटात जोर पाहिजे ना | फडणवीस

“जी मदत करायची आहे ती मोदीसाहेब करतील पण तुमच्या मनगटात जोर पाहिजे ना, सरकार बनविता तीन तीन पक्ष एकत्रित येतात आणि या ठिकाणी सांगत आम्ही मदत करू, एक नव्या पैशाची मदत याठिकाणी ठाकरे सरकारने केली नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणे असे वचन दिले असे म्हणता पण मला सांगात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे वचन शिवसेना प्रमुखांना दिले होते का?,” सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

Related posts

कोरोनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कडक कारवाई करणार

rasika shinde

‘शिवराज्याभिषेक सोहळा’ असा महाराष्ट्राचा चित्ररथ

News Desk

युतीचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री फडणवीस मिळून घेऊ – उद्धव ठाकरे

News Desk