HW News Marathi
महाराष्ट्र

#26/11Attack : कसाबला फाशी दिली मात्र अजूनही अनेक नराधम जिवंत आहेत !

मुंबई | आजच्याच दिवशी १२ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल १६६ जण मृत्युमुखी पडले होते तर ३०० हूनही अधिक जण गंभीररीत्या जखमी झाले होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही देशातील लोकांच्या अंगावर शहारा आणणाऱ्या आहेत. हा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांपैकी हाती लागलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला फाशी देखील दिली गेली आहे. परंतु, आजही अनेक नराधम उघडपणे जगभर फिरत आहेत आणि दहशतवादी हल्ले घडवत आहेत.

त्या दिवशी नेमके काय घडले ?

पाकिस्तानमधून समुद्रमार्गे भारतात घुसलेले लष्कर-ए-तोयबाचे १० दहशतवाद्यांनी विविध गट तयार करून यहुदी गेस्ट हाऊस, नरिमन हाऊस, सीएसएमटी स्थानक, ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आणि कामा रुग्णालय येथे घुसून हल्ला केला आहे. त्यांनी ठिकठिकाणी बॉम्ब हल्ले करत लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात १६६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. हा हल्ला भारतावर झालेल्या हल्ल्यांपैकी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.

अजमल कसाब

राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या अनेक तासांच्या चकमकीत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले तर दहशतवादी अजमल आमिर कसाबला जिवंत पकडण्यात यश आले. अजमल कसाबने या दहशतवादी हल्ल्याचा कट हा पाकिस्तानचाच होता हे मान्य केले. कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील येरवाडा तुरुंगात फाशी देण्यात आली.

हाफिज सईद

हाफिज सईद हा मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रमुख सूत्रधार होता. प्रतिबंधित संघटना जमात-उद-दावा याचा प्रमुख आणि मुंबईवरील हल्ल्याचा गुन्हेगार असलेल्या या दहशतवाद्याला तीन दिवसांपूर्वीच पाकिस्तानने नजरकैदेतून मुक्त केले आहे. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या कट रचण्यात देखील याचा समावेश होता. इतकेच नव्हे तर ११ जुलै २००६ रोजी मुंबई लोकल मध्ये झालेल्या हल्ल्यात देखील त्याचा समावेश होता.

जकी-उर रहमान लखवी

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जकी-उर रहमान लखवीचे नाव राष्ट्रीय तपस संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वांटेड लिस्टमध्ये आहे. २६/११ च्या हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी कसाब याने असा खुलासा केला होता कि, लखवीने त्याला आणि इतर दहशतवाद्यांना मुंबई हल्ल्यासाठी चेतविले होते. मुंबई २६/११ च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार लखवीला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (आयएसआय) आणि पाकिस्तानी सैन्याचे संरक्षण होते.

सैयद जबीउद्दीन अंसारी उर्फ अबु जुंदाल

ऑगस्ट २००६ रोजी औरंगाबाद आर्म हॉल प्रकरणात २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू जुंदालला मकोकाच्या स्पेशल कोर्टात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अबू जिंदाल हा मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे षडयंत्र आखण्यात प्रमुख होता. यानेच पाकिस्तानच्या मुजफराबाद शहरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते.

डेविड कोलमैन हेडली

दहशतवादी डेव्हिड हेडली हा पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबासाठी काम करत होता. यानेच मुंबई हल्ल्याचा कट आखण्यात आणि तो कट पूर्णत्वास नेण्यात प्रमुख भूमिका बजावली होती हे सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर खटला चालविण्यात आला होता. या खटल्यात फाशीची शिक्षा भोगावी लागू नये म्हणून तो सरकारी साक्षीदार झाला आणि त्याने आपला गुन्हा कबुल केला. मुंबई हल्ल्यात सहभागी झाल्यास हेडली याला अमेरिकेच्या कोर्टाने २४ जानेवारी २०१३ रोजी ३४ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

या दहशतवाद्यांव्यतिरिकीत अन्य ७ तहव्वुर राणा, अब्दुल वाजिद, मजहर इकबाल, हमद अमीन सादिक, शाहिद जमील रियाज, जमील अहमद आणि यूनिस अंजुम यांच्यावर देखील मुंबई २६/११ च्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुद्धिबळ ऑलिंपियाड संयुक्त विजेत्या भारतीय संघाचंअजित पवार यांच्याकडून अभिनंदन

News Desk

शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते, पण कधीच…! फडणवीसांनी डिवचलं

News Desk

प्रशांत किशोरची मला गरज नाही – शरद पवार

News Desk