मुंबई | महाराष्ट्र्रातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या वेगाने वाढत आहे. त्यातच, राज्यात आज (२२ मे) कोरोनाबाधितांच्या आकड्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २,९४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ४४,५८२ वर पोहोचला आहे. एकट्या मुंबईतील गेल्या २४ तासांत १,७५१ रुग्णांची नोंद झाली असून मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता २७,२५१ वर पोहोचला आहे.त्यापैकी ३०,४७४ कोरोनाबाधित हे राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आता राज्यासाठी एक दिलासादायक बाबा अशी कि, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ८५७ रुग्णानानी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
राज्यात आज 2940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 44582अशी झाली आहे. आज नवीन 857 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 12583 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 30474 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 22, 2020
राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे तब्बल ६३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आकडा १५१७ वर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत या ६३ जणांपैकी ३७ पुरुष तर २६ महिलांचा समावेश आहे. तर त्यापैकी २८ रुग्ण हे ६० वर्षे व त्यापेक्षाही जास्त वयाचे आहेत तर ३१ रुग्ण हे ४० वर्षे ते ५९ वर्षे वयोगटातील आहेत. त्याचप्रमाणे, त्यांपैकी ४ रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. आपल्याला वारंवार सांगितल्याप्रमाणे, आधीपासून एखादी व्याधी असलेल्या व्यक्तीला कोरोनाचा धोका अधिक आहे. या ६३ नव्या कोरोनाबाधितांपैकी पैकी ४६ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाच्या व्याधी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.देशभरात अन्य राज्यांच्या तुलनेत सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक राहिले आहे. त्यामुळे, राज्य सरकारची जबाबदारी देखील चांगलीच वाढली आहे.