HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी

सातारा | सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये कोरोनामूळे ५४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू आज (११ एप्रिल) पहाटे झाला. सातारा जिल्ह्यातील कोरोनामूळे हा दुसरा मृत्यू आहे. हा बाधित मुंबईत मत्स्य व्यवसाय करणारा होता. परंतू, २१ मार्चला तो आपल्या गावी गेला होता. आणि त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

या रुग्णावर कराडच्या कृष्णा हॉस्पीटमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, या रुग्णाचा मृत्यू हा कोरोनासह मधूमेहामुळेही झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तर, साताऱ्यात, २४ जणांचे काल (११ एप्रिल) दुसरे कोरोना चाचणीचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी थोडा का होईना पण सुटकेचा श्वास सोडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, १४ मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा

News Desk

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही”, फडणवीसांचा राऊतांना टोमणा

News Desk

बच्चू कडू यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणी शिक्षा आणि जामीन

Aprna