नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधितांची संख्या ६७६१ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत २०६ लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१० एप्रिल) माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ही गोळी उपायकारक ठरत आहे. सध्या भारत ३.२८ कोटी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळ्या उपलब्ध आहे. तर तर भारताला १ कोटी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळ्याची गरज आहे. अतिरिक्त गोळ्या निर्यात केल्या जात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
We have a domestic requirement of 1 crore hydroxychloroquine tablets while we have 3.28 crore hydroxychloroquine tablets available now: Lav Agrawal, Joint Secretary, Ministry of Health pic.twitter.com/tzFdyflQul
— ANI (@ANI) April 10, 2020
देशभरात ५१६ जण कोरोनामुक्त झाले असून गेल्या २४ तासांत ८९६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. तर देशात गेल्या ४८ तासात १४८७ कोरोना पॉझिटिव्ही रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्र्यालयाने दिली आहे. भारत सरकारने 20 हजार 473 विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवलं आहे.
37 deaths, 896 new cases in last 24 hours, the sharpest ever increase in cases; India's total number of #Coronavirus positive cases rises to 6761 (including 6039 active cases, 516 cured/discharged/migrated and 206 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/HbQKf5BMPt
— ANI (@ANI) April 10, 2020
देशात कालपर्यंत (९ एप्रिल) १६००२ लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र, यातून केवळ ०.२ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्टी झाले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. देशात कोरोनाचे टेस्ट १४६ सरकारी प्रयोगशाळांमध्ये केली जात आहे. तर ६७ खासगी प्रयोगशाळांनाही कोरोनाची टेस्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Lav Agarwal speaking to ANI: It is clarified 2% cases tested positive out of 16,002 samples tested yesterday not 0.2% as mentioned earlier. https://t.co/r2z5FBMSEM
— ANI (@ANI) April 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.