HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : पिंपरीतील तीन रुग्ण कोरोनामुक्त आज घरी परतणार

पुणे | राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होता दिसून येत आहे. तर सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३६ वर पोहोचली आहे. राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असली तरी दुसऱ्या बाजूला पुण्याती पिंपरी-चिंचवडमधील पहिले तिन्ही रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. या तिन्ही जणांचा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. काल (२६ मार्च) त्यांची दुसऱ्यांदा चाचणी घेण्यासाठी नमुने पाठवले होते. या तिघांना आज (२७ मार्च) त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. यामुळे ही राज्यातसाठी दिलासादायक बातमी आहे.

दरम्यान, हे तिन्ही जण पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्यासोबत दुबईला गेले होते. या तिन्ही जणांनी ११ मार्चला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले होते. तेव्हापासून या तिघांवर महापालिकेच्या रुग्णलयात उपचार सुरू होते. मात्र, इथून पुढचे १४ दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहण्याची सूचना डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मागील ६ दिवसात एकही नवा कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली नाही, अशी माहिती पिंपरी-चिंचवडमधील महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. सध्या देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ७०० हून अधिक झाली असून तर देशात १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊ घोषित करण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३६ वर

मुंबई – ५१

पिंपरी-चिंचवड – १२

पुणे – २०

सांगली – ११

नवी मुंबई – ५

कल्याण – ५

नागपूर – ९

यवतमाळ – ४

अहमदनगर – ३

ठाणे – ५

सातारा – २

पनवेल – १

उल्हासनगर – १

औरंगाबाद – १

रत्नागिरी – १

वसई विरार – १

सिंधुदुर्ग – १

कोल्हापूर – २

गोंदिया – १

एकूण- १३६ कोरोनाग्रस्तांची संख्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी विरोधात ट्विट केल्याने कंगनावर कर्नाटकात FIR दाखल

News Desk

साखर कारखान्यांत मोठा घोटाळा, सोमैय्यांची रोहित पवारांच्या चौकशीची मागणी..!

Ruchita Chowdhary

गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला चाबकाचाही फरक पडणार नाही | धनंजय मुंडे

News Desk