HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात काल 3,063 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

मुंबई। कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल 3,063 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 71 हजार 728 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे.

कुठे किती रुग्ण?

56 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 396 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (09), नंदूरबार (6), धुळे (3), जालना (52), परभणी (59), हिंगोली (17), नांदेड (12), अकोला (27), वाशिम (08), बुलढाणा (06), यवतमाळ (08), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (4), चंद्रपूर (95), गडचिरोली (18 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

सध्या 36 हजार 484 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,45,427 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,423 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 87, 39, 974 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,50, 856 (11.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई वडिलांनी दिले स्पष्टीकरण

Manasi Devkar

चांगलं काम करणाऱ्यालाच तिकीट; राज ठाकरेंनी घेतली शाखाध्यक्षांची शाळा!

News Desk

“दादा, आपण असे करू. एकतर तुम्ही मला चहाला बोलवा किंवा तुम्ही माझ्याकडे या – अजित पवार

News Desk