HW Marathi
महाराष्ट्र

शेतकरी कन्यांचे पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

अहमदनगर । गेल्या पाच दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुंलीचे आंदोलन सुरु आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी या शेतकरी कन्या आंदोलनाला बसल्या आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपुर्ण कर्जमाफी करावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा विविध मागण्यांसाठी पुणतांब्यातील या मुलींनी अन्यत्याग आंदोलन सुरू केले आहे.

स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी रात्री (८ फेब्रुवारी)  या मुलींना सरकारी रुग्णालयात दाखल केले. पोलीसांनी बळजबरीने मुलींना रुग्णलायात दाखल केले असल्याचे म्हणत या मुलींनी आणि गावऱ्यांनी या करवाइला विरोध दर्शवला आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्याठीकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर सरकारने आमची शेती करावी. त्याबदल्यात आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार द्यावा, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या तरुणींनी केली आहे.

या आंदोलनाला पाच दिवस झाले आहे तरी अजूनही यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. शुक्रवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींसोबत चर्चा केली मात्र त्य़ातून कूठलाही तोडगा निघाला नाही.

Related posts

साप चावल्यानं मुलीचा झोपेतच मृत्यू

News Desk

ध्वनी प्रदूषणामुळे २०२ गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल

अपर्णा गोतपागर

महत्त्वाच्या शासकीय संस्थांना सुरक्षा पुरवा

News Desk