मुंबई । सांगली, कोल्हापूर येथील पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने आतापर्यंत ४ लाख २४ हजार ३३३ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक शासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एनडीआरएफ, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदत करत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमच्या १५ नौदलाचे पथक बोटींसह शिरोळकडे रवाना होत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.
◆ कोस्ट गार्ड- १६ पथके
◆ एनडीआरएफ- २३
◆ एसडीआरएफ -३
◆ नेव्ही-४१
◆ सैन्यदल-२१
अशी एकूण १०४ पथके #सांगली व #कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात कार्यरत#MaharashrtraFloods pic.twitter.com/1vHEdn2Ds5
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 10, 2019
स्थानिक शासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे २३ तसेच नौदलाच्या ४१, तटरक्षक दल, सैन्यदलाचे २१ पथके, अशी एकूण १०४ पथके सांगली व कोल्हापुरात जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात कार्यरत आहेत. राज्यातील पूरग्रस्तांना वैद्यकीय विभागाच्या पथकांचा दिलासा. राज्यभरात ३२५ वैद्यकीय पथके कार्यरत तर कोल्हापूर आणि सांगली भागात सुमारे ७० पेक्षा अधिक वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.
विशाखापट्टणम येथून @indiannavy च्या आणखी १५ जणांच्या पथकाचे बोटीसह वायूदलाच्या विमानाने #कोल्हापूर विमानतळावर आगमन. हे पथक शिरोळ येथे मदत कार्यासाठी होणार रवाना pic.twitter.com/ru4nDZXXxm
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 10, 2019
Kolhapur, Sangli, NDRF, Devendra Fadnavis, Army, Navy,
तसेच विशाखापट्टणमचे १५ नौदलाचे पथक बोटींसह शिरोळमध्ये काल (१० ऑगस्ट) दुपारी पोहोचत आहेत. आतापर्यंत कोल्हापूर येथील २ लाख ३३ हजार १५० तर कोल्हापूर जिल्ह्यात ७४ बोटींद्वारे तर सांगली जिल्ह्यात ९३ बोटींद्वारे मदतकार्य सुरु आहे.
#सांगली जिल्ह्यात १०१ गावांमधून १ लाख ४३ हजार ६४१ व्यक्ती व ३५ हजार २४१ जनावरे यांचे तात्पुरते स्थलांतरण. सार्वजनिक बांधकामचे ४८४ कि.मी. चे रस्ते बाधित. महावितरणकडील २ हजार ६१५ रोहित्रांचे नुकसान, कृषीचे नजरअंदाजे नुकसान २७ हजार ४६७ हेक्टर जमिनीचे अंदाजे नुकसान- मुख्यमंत्री
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 10, 2019
सांगली जिल्ह्यात १०१ गावांमधून १ लाख ४३ हजार ६४१ व्यक्ती व ३५ हजार २४१ जनावरे यांचे तात्पुरते सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्यात आहे. सार्वजनिक बांधकामचे ४८४ कि.मी. चे रस्ते बाधित झाले असून महावितरणकडील २ हजार ६१५ रोहित्रांचे नुकसान, कृषीचे अंदाजे नुकसान २७ हजार ४६७ हेक्टर जमिनीचे अंदाजे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.