HW News Marathi
महाराष्ट्र

पारनेरमध्ये शिवसेनेच्या ५ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश , शिवसेनेला धक्का

अहमदनगर । राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना राष्ट्रवादीत फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. खरंतर राज्यात एकत्र सत्ता स्थापन करण्यापूर्वीच पारनेरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची नगरपंचायतीवर एकत्र सत्ता आली होती. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी चक्क पक्षाला रामराम ठोकत आज (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. दरम्यान, राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत

पारनेर शिवसेनेच्या या ५ नगरसेवकांनी दुपारी बारामतीला जाऊन राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे . त्यांच्यासोबत अन्य काही पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ५ नगरसेवकांच्या या राष्ट्रवादी प्रवेशाने आता निश्चितच पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे बळ वाढले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मात्र मोठा फटका बसला आहे. पुढच्या महिन्यात असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी निश्चितच हा धक्का आहे.

शिवसेनेच्या ‘या’ ५ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

डॉ. मुद्दस्सीर सय्यद

नंदकुमार देशमुख

किसन गंधाडे

वैशाली औटी

नंदा देशमाने

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांच्या ED कोठडी सुनावणीदम्यान न्यायालयात नेमके काय झाले

Aprna

 सेवानिवृत्त पोलीस संघटनेचा कोल्हापूर येथे मेळावा

News Desk

शुभमंगल होण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू

News Desk