HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक ! पुण्यात एका दिवसांत ५ जणांचा कोरोनामूळे मृत्यू

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा अव्वाच्या सव्वा वाढत चालला आहे. अर्थात त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही आहेच पण मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. पुण्यात आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात मधल्या काळात कोरोनाची संख्या ठप्प झाली होती. पण आता पुन्हा एकदा पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. काल मध्यरात्रीनंतर पुण्यात ९ रुग्ण सापडले. पुण्यातील वाढता आकडा लॉकडाऊन पुढे जाण्याचे कारण बनू शकते.

या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर पुण्याच्या नायडू, ससून आणि हडपसर येथील नोबेल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील ५ जणांचा आज (८ एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात ससून रुग्णालयातील ३ जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये एक ५० वर्षीय महिला आहे. अन्य दोघे हडपसर आणि कोंढाव्यातील राहणारे होते. यापैकी एकाचे वय ५४ तर दुसऱ्याचे वय ७१ वर्षे होते. नायडू रुग्णालयात एका ४४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला अनियंत्रित मधुमेहाचा आजार होता. त्यातच त्याचे मूत्रपिंडही निकामी झाले होते. तसेच, हडपसर येथील नोबेल रुग्णालयात एका ७३ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान जवळपास ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

News Desk

बीड जिल्ह्यातील विकास कामाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मुंडे बहीण भावात जुंपली!

News Desk

“शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला. बेणं पक्कं आहे, कच्चा नाही”, हर्षवर्धन यांनी मुलाचे कौतुक करत सासऱ्याला लगावला टोला   

News Desk