HW News Marathi
महाराष्ट्र

जपानहुन आलेल्‍या ६१ परदेशी नागरिकांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

शिर्डी :-जपानहुन आलेल्‍या ६१ परदेशी नागरिकांच्‍या हारदाजी ग्रुपने श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले व श्री व्‍दारकामाई मंदिरासमोरील खुल्‍या नाट्यगृहाच्‍या प्रांगणात विश्‍वशांती यज्ञ केला आहे.

जपानहुन गेल्‍या 3 वर्षापासून हारदाजी ग्रुपच्‍या माध्‍यमातून हे साईभक्‍त साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येत असतात. जपानमध्‍ये 3 वर्षापुर्वी मंजु सत्‍य यांनी साईबाबांचे मंदिर बांधले असून या ठिकाणी शिर्डी मंदिराप्रमाणे दैनंदिन कार्यक्रमही सुरु केलेले आहे. संस्‍थानच्‍या वतीने जपानी साईभक्‍तांचे विश्‍वस्‍त तथा माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी स्‍वागत केले. या सर्व साईभक्‍तांनी श्रींच्‍या धुपारतीला हजेरी लावली. तर आज दुपारी श्री साईप्रसादालयात प्रसाद भोजन घेतले.

याप्रसंगी वाकचौरे म्‍हणाले, जपानमध्‍ये साईबाबांच्‍या कार्याचा प्रचार व प्रसार करण्‍याचे काम हे साईभक्‍त करत असून शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने जपानच्‍या या साईभक्‍तांनी चांदीच्‍या पादुकांचा दर्शन सोहळा जपानमध्‍ये करण्‍याची जी मागणी केली आहे. ती स्‍वागतार्हत आहे. यामुळे श्री साईबाबांचा सर्वधर्म समभावाचा व श्रध्‍दा सबुरीचा संदेश जपानमध्‍ये पोहचण्‍यास निश्चित मदत होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अजूनही चिपळूणकर मदतीच्या प्रतीक्षेत’, उदय सामंत म्हणतात मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार!

News Desk

मराठा आरक्षणावर शरद पवारांनी ही दिली प्रतिक्रिया….

News Desk

कोण होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष? कोणाच्या  नावाची लागणार वर्णी

News Desk