HW News Marathi
Covid-19

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघात ६८ टक्के मतदान

पंढरपूर । राज्यात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. दरम्यान, आज (१७ एप्रिल) या मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. प्राथमिक अंदाजानुसार ६८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचेच सुपुत्र भगीरथ भालके यांना तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ह्याच दोन उमेदवारांमध्ये मोठी चुरशीची लढत आहे. भाजप-राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान, आज झालेले हे मतदान शांततेत पार पडले. मतदान प्रक्रियेत भारत निवडणूक आयोग आणि आरोग्य विभागाने कोरोना विषयक दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले गेल्याची माहितीही मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश जावडेकर यांनी मास्क घालण्याबाबत सांगितलं की…!

News Desk

स्वार्थी राजकारणासाठी जोमात, सामाजिक प्रश्नावर कोमात ! ‘लोकल’च्या वादात रोहित पवारांची उडी 

News Desk

जाणून घ्या…यंदाचे शैक्षणिक वर्ष असे असणार

News Desk