मुंबई | महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांत पुर आला आहे. असं असताना मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सात जण जखमीही झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात आझ (२३ जुलै) पहाटे ४.५८ वाजता तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra | Seven people injured, three died after a building collapsed in Govandi area of Mumbai. Details awaited: Mumbai Police
— ANI (@ANI) July 23, 2021
यामध्ये आणखी ७ जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारतीय हवामान खात्याने २ दिवसांआधी मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता, तर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, रायगड, महाराष्ट्रात चार ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.